भारतावर निर्बंध लादल्यास अमेरिकेचेच नुकसान – संरक्षण मंत्री जिम मॅटिस

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतवर निर्बंध लादले तर त्यात अमेरिकेचेच नुकसान आहे, ही गोष्ट अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. भारत रशियाकडून एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. ती विकत घेण्यावरून नवीन कायद्याप्रमाणे भारतावर प्रतिबंध लादले, तर त्यापासून अमेरिकेचेच नुकसान होणार आहे, असे जिम मॅटिस यांनी अमेरिकन खासदारांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सीएएटीस (काऊंटरिग अमेरिका ऍडव्हर्जरीज थ्रू सेक्‍शन ऍक्‍ट) नुसार निर्बंध टाळण्यासाठी जे देश रशियन शस्त्रे खरेदी करणे टाळत आहेत, त्यांना सूट देणे आवश्‍यक आहे, असे जिम मॅटिस यांनी खासदारांना स्पष्टपणे सुनावले आहे.

या वर्षी जानेवारीत अमलात आलेल्या सीएएटीएस ऍक्‍टवर सन 2017 मध्ये सह्या करण्यात आल्या होत्या. या कायद्यानुसार जे देश रशियाकडून संरक्षणसंबंधी वा गुप्तचर विभागासाठीची सामग्री खरेदी करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अमेरिकला देण्यात आलेला आहे.

भारत-अमेरिका संबंधांबाबत बोलताना जिम मॅटिस म्हणाले की, भारताच्या रूपाने शतकानुशकात एखाद्याच वेळी हाती येणारी दुर्मिळ संधी अमेरिकेला मिळालेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले अमेरिकेने स्वताहाच्य स्वार्थासाठीच पाकिस्तानचा जसा उपयोग करून घेतला व पाकिस्तानची आजची दुर्दशा होण्यास जसा अमेरिका जबाबदार ठरत आहे तोच प्रकार भारताबाबत न व्होवो म्हणजे मिळवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)