भारताने लाखों नागरिकांना गरिबीतून मुक्त केले – ट्रम्प

ट्रम्प यांच्याकडून स्तुतिसुमने
संयुक्त राष्ट्रे – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 73 व्या अधिवेशनात बोलताना भारतावर स्तुतिसुमने उधळली. मुक्त समाज असणाऱ्या भारताने लाखों नागरिकांना गरिबीतून मुक्त केले, असे त्यांनी म्हटले.

आपल्या भाषणात इराणवर जोरदार टीकास्त्र सोडताना ट्रम्प यांनी त्या देशाच्या नेतृत्वाचा उल्लेख भ्रष्ट हुकूमशाही अशा शब्दांत केला. इराणचे नेते अनागोंदी, मृत्यू आणि विनाशाची बीजे पेरत आहे. त्यांना शेजारी देश किंवा सीमांविषयी आणि इतर देशांच्या सार्वभौम अधिकारांविषयी आदर वाटत नाही, असे ते म्हणाले. इराणवर आर्थिक दबाव टाकण्यासाठी अमेरिकेने मोहीम हाती घेतली आहे. इराणकडून कच्च्या इंधनाची आयात करणाऱ्या देशांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिका केवळ मित्रांनाच मदत देईल. ज्या देशांना आम्ही आमचे डॉलर्स आणि संरक्षण पुरवतो; ते आमचे हित जोपासतात की नाही यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. काय घडतेय आणि काय घडत नाही ते आम्ही पाहत आहोत. आमचा आदर करणाऱ्यांनाच आम्ही मदत उपलब्ध करू, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. त्यातूून त्यांनी पाकिस्तानसारख्या देशाला कठोर इशाराच दिल्याचे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाला (आयसीसी) कुठली वैधता नाही. अशा संस्थेला अमेरिका कदापि पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी नमूूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)