भारतात फक्त ईव्हीएमचं राहणार ! – मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली: भारतात आता फक्त ईव्हीएमच राहणार. पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार नसल्याचे  मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ईव्हीएम हँकिंगचा वाद बाजूला करत स्पष्ट केले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात अरोरा बोलत होते.

लंडनमधील हॅकथॉनमध्ये एका कथित सायबर तज्ज्ञाने ईव्हीएम हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा केला होता. त्यानंतर संपूर्ण भारतात चेर्चेला उधाण आले होते. तसेच अनेक राजकीय पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्तांनी मतपत्रिकेद्वारे मतदानाची शक्यता फेटाळून लावत. आम्ही ईव्हीएमद्वारे विश्वासार्ह, निष्पक्ष, तटस्थ आणि नीतीने निवडणूक घेण्यात नक्कीच यशस्वी होऊ, असे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हँक झाल्याचा दावाही कथिक सायबर तज्ज्ञ सय्यद सुजा याने केला होता. अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने आज  खळबळजनक खुलासा केला आहे. इलेक्ट्राॅनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही. अमेरिकास्थित सायबर एक्स्पर्ट सईद सूजा याने लंडनमध्ये याबाबत खुलासा केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम हॅक केलं गेल होतं आणि हे काम 14 जणांच्या टीमने केले होत. यापैकी काहीची हत्या झाल्याचा दावा देखील सय्यद सुजाने केला.

यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे पत्राद्वारे केली होती. संसद मार्ग पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)