भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांना गुगलकडून अनेक सुविधा 

भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 39 कोटींवर 
भारतातील दीड हजार शहरांच्या नकाशांचे अपडेटींग 
यापुढे मराठी भाषेत बोलुनही गुगल असिस्टंटला सूचना देण्याची सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात गुगलने भविष्यातील योजनांबाबत अनेक घोषणा केल्या. यावेळी गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्‍टर प्रवीर गुप्ता यांनी गुगल असिस्टंटची सेवा आता मराठी भाषेतही सुरू होत असल्याची घोषणा केली. गुगल असिस्टंटची सेवा आता हिंदी आणि इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषांमध्येही सुरू होणार आहे. यामध्ये सध्या मराठी भाषेत सेवा उपलब्ध होणार असून लवकरच इतर सात भारतीय भाषांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे ही सेवा वापरणाऱ्याची संख्या वाढेल. 
नवी दिल्ली: तंत्रज्ञान कंपनी गुगलने आज दिल्लीत झालेल्या गुगल फॉर इंडियाच्या चौथ्या आवृतीत भारतीयांसाठी अनेक नव्या योजना जाहीर केल्या. भारतामध्ये रोज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 39 कोटी असल्याचे सांगतानाच गुगलने प्रत्येक इंटरनेट वापरणाऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी नवीन फिचर्स आणि सुविधा सुरू केल्या आहेत. यामध्ये काही विशेष सुविधा काही राज्यांसाठी मर्यादित असल्या तरी भारातातील सर्वच ग्राहकांसाठी गुगलने अनेक उपयोगी सेवा सुरू केल्या आहेत.
आजही पारंपरिक पद्धतीने लिखाण करणाऱ्या लेखकांनी आपले लिखाण ऑनलाइन आणावे म्हणून गुगलकडून विशेष प्रयोग सुरू करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये या प्रयोगाअंतर्गत अनेकांनी लिहायला सुरुवात केली आहे.
वेबपेजेस मोठ्याने वाचून दाखवणारे नवीन ऑडिओ फिचर गुगलने लॉन्च केले आहे. यामध्ये मराठी, बंगाली, मल्याळम भाषांचा समावेश असेल. लवकरच 28 भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. ही सेवा टू जी इंटरनेट रेंजवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गुगल एआयच्या मदतीने पुरासंदर्भातील इशारा देण्यापासून ते मधुमेहाच्या चाचण्यांपर्यंत अनेक गोष्टी करता येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोलकात्यामधील एक लाख लोकांचे पत्ते गुगलवर उपलब्ध करून देणार. या प्रकल्पाअंतर्गत 25 हजार घरांना गुगल मॅपवर पाहता येतील.
गुगलने टर्न बाय टर्न म्हणजेच पावलोपावली अपडेट देणारे खास मॅप्स भारतीयांसाठी सुरू केले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसासंदर्भातील माहितीही दिली जाईल. भारतामधील दीड हजार शहरांचे नकाशे अपडेट केले जातील. तर या शहरांमधील 20 हजार बसमार्गांची माहिती नकाशांवरच उपलब्ध करून दिली जाईल.
गुगलने आपल्या पेमेन्ट ऍप्लिकेशनचे तेज हे नाव बदलून गुगल पे असे केले आहे. त्या द्वारा पेमेंट सुविध दिल्या जाणार आहेत.
गुगलने आपल्या ऍण्ड्रॉइडच्या पाय व्हर्जनची (ऍण्ड्रॉइड गो) घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारतामध्ये ऍण्ड्रॉइड पाय उपलब्ध होणार आहे, असे अधिकारी म्हणाले. मायक्रोमॅक्‍स, लावा, नोकिया फोनमध्ये ऍण्ड्रॉइड गो लवकरच उपलब्ध होईल. याशिवाय पुढील महिन्यामध्ये सॅमसंग कंपनी भारतातील पहिला ऍण्ड्रॉइड गोवर चालणारा फोन लॉन्च करणार आहे, त्याना याचा फायदा होणार आहे.
याशिवाय, आता गुगल असिस्टंवर ट्रेनचे लोकेशनही समजू शकणार आहे.एका ऍपसोबत गुगल असिस्टंटने भागीदारी केली आहे त्यामुळे प्रश्न विचारताच ट्रेनच्या जागेची माहिती फोनचा वापर करणाऱ्याना मिळेल. भारतातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या पहाता गुगल भारताबाबत कमालीची आशावादी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)