भारतातील विमान कंपन्यांचे भाडे कमी… 

इंडिगो आणि एअर इंडिया एक्‍स्प्रेस स्पर्धात्मकतेत आघाडीवर 
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांत स्वस्त हवाई सेवा देणाऱ्या पाचमध्ये भारतातील दोन कंपन्यांचा समावेश आहे. एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया एक्‍स्प्रेसचा दुसरा, तर इंडिगो एअरलाईन्सचा पाच क्रमांक असल्याचे रोमरिओ या कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हणण्यात आले.

ग्लोबल फ्लाईट प्रायसिंग रिपोर्ट नावाच्या या अहवालात जेट एअरवेज आणि एअर इंडिया या भारतीय कंपन्या अनुक्रमे 2 आणि 5 व्या स्थानी आहेत. भारतात आगामी काळात हे क्षेत्र वेगाने विस्तारणार आहे. जगभरातील 200 विमान कंपन्या प्रतिकिमीसाठी सरासरी किती भाडे आकारतात, यानुसार हा अहवाल तयार करण्यात आला. एअर एशिया एक्‍स ही जगातील सर्वात स्वस्त हवाई सेवा देणारी कंपनी ठरली आहे. मलेशियाची ही कंपनी प्रतिकिमीसाठी 0.07 डॉलर भाडे आकारते. याबाबतीत एअर इंडिया एक्‍स्प्रेसकडून किमीसाठी 0.08 डॉलर आणि इंडिगोकडून 0.10 डॉलरचे शुल्क घेण्यात येते. एअर इंडिया एक्‍स्प्रेसकडून आखाती देश, सिंगापूर, तर इंडिगोकडून देशातील शहरे, आखाती देश, बॅंकॉक, कोलंबो आणि काठमांडूमध्ये सेवा देण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या यादीतील पाच कंपन्यांपैकी चार आशियातील आहेत. यंदा या सूचीमध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील कोणत्याही विमान कंपनीचा समावेश नाही. तिसऱ्या स्थानी इंडोनेशिया एअर एशिया आणि प्रायमेरा एअर यांचा समावेश आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातील इकोनॉमी क्‍लासमधील भाडयाचा विचार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)