भारताच्या विकासदराबाबत आशावादी

जागतिक बॅंक कर्जपुरवठा वाढविणार

वॉशिंग्टन: जागतिक बॅंकेने भारतासोबतच्या महत्त्वाकांक्षी पंचवार्षिक आराखड्यास मंजुरी दिली असून, त्यानुसार बॅंकेकडून भारताला 25 ते 30 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे. यामुळे कनिष्ठ-मध्यम उत्पन्न गटातून उच्च-मध्यम उत्पन्न देशांच्या गटात जायला मदत होईल. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बॅंकेने भारतासाठी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कला मंजुरी दिली आहे. जागतिक बॅंकेचे दक्षिण आशिया विभागप्रमुख हार्टविग शाफेर यांनी सांगितले की, सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने गेल्या दशकात सर्वाधिक लोकांना दारिद्य्ररेषेच्या बाहेर काढले आहे. भारत 2030 पर्यंत उच्च-मध्यम उत्पन्न देश बनेल. जागतिक बॅंकेचे भारतातील संचालक जुनैद अहमद यांनी सांगितले की, हा भारतासोबतचा जागतिक बॅंकेचा पहिला भागीदारी आराखडा आहे. याअंतर्गत आम्ही पाच वर्षे एकत्र काम करू.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या अनेक दशकांपासून भारताने प्राप्त केलेल्या अतुलनीय वृद्धीची जागतिक बॅंकेने दखल घेतली आहे. त्यानुसार, हे अर्थसाह्य देण्यात येत आहे. भारताला उच्च-मध्यम उत्पन्न देश बनविण्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरेल. त्याद्वारे भारताला संसाधन कार्यक्षम व एकात्मिक वृद्धी, रोजगारनिर्मिती व मनुष्यबळ भांडवल उभारणी अशा महत्त्वाच्या क्षेत्रातील समस्यांवर मार्ग काढता येईल. या आराखड्यानुसार, विविध आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून भारताला 25 ते 30 अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मिळणार आहे. या वित्तसंस्थांत आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी व विकास बॅंक (आयबीआरडी), आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (आयएफसी) आणि बहुविध गुंतवणूक हमी संस्था (मिगा) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)