भारताच्या मुलींची विजयी सलामी; जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे – महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या गटात भारत “अ’ संघाने शुक्रवारी ब्राझीलवर मात करून विजयी सलामी दिली.म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे.

मुलींच्या गट-2 मध्ये भारत “अ’ संघाने ब्राझीलवर 5-0 ने मात केली. यातील दुहेरीच्या पहिल्या लढतीत निकिता संजय – अंजना कुमारी जोडीने मारिया रोचा – लोरेना व्हिएरा जोडीवर 19-21, 21-19, 21-17 असा विजय मिळवला. यानंतर शिवप्रिया – चिमरन कलिता जोडीने माद्रदो – ग्लेयसी मौरा जोडीवर 21-7, 21-12 अशी मात केली. एकेरीत निकिताने मारियावर 21-14, 21-10 असा, प्रेरणा अल्वेकरने सिझिअने फेरोवर 21-6, 21-8 असा, तर कलिताने लोरेनावर 21-13, 21-13 असा विजय मिळवला. शालेय गटातील मुलींच्या गट-1मध्ये चीनने भारत “अ’ संघावर 5-0 ने मात केली.

   मुलांमध्ये भारताच्या “अ’ संघाची “ब’ संघावर मात

मुलांच्या गटात भारत “अ’ संघाने भारत “ब’ संघावर 5-0 ने मात केली. यात दुहेरीत रितूपर्णा बोरा – त्रिखा वरुण जोडीने आर्यमन – अनिश जोडीवर 21-16, 8-21, 21-16 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यानंतर मन्नेपल्ली तरुण – पारस माथूर जोडीने गौतम – अर्जुन जोडीवर 21-18, 21-18 अशी मात केली. यानंतर एकेरीत मोनिमुग्धाने अनिरुद्धसिंगचे आव्हान 21-15, 14-21, 21-12 असे परतवून लावले. यानंतर तरुणने अर्जुनवर 21-16, 18-21, 21-10 अशी, तर पारसने गौतमवर 21-19, 21-18 अशी मात केली.

   शालेय गटात पराभवाने सुरुवात

शालेय गटातील मुलींच्या गट-1 मध्ये चीनने भारत “अ’ संघावर 5-0 ने मात केली. यातील एकाही लढतीत भारतीय मुलींना चीनच्या मुलींसमोर आव्हान निर्माण करता आले नाही. यातील पाचही लढती एकतर्फीच झाल्या. मुलांच्या गट-1 मध्ये चीनने भारत “ब’ संघावर 5-0 ने सहज मात केली. मुलांच्या गट-2 मध्ये इंग्लंडने भारत अ संघाचा 5-0 ने धुव्वा उडविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)