भामा-आसखेडचा बोजा रु. 170 कोटींवर

पालिका देणार खर्च : स्थायी समितीचा निर्णय

पुणे – शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजनेचा तब्बल 170 कोटींचा बोजा उचलण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते, त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने 162 कोटी 60 लाख रुपयांच्या सिंचन पुनर्स्थापना खर्चाची मागणी पालिकेकडे केली होती. हा निधी देण्यासाठी पुढील वर्षाच्या ( 2019-20) च्या अंदाजपत्रकात अर्थशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च माफ करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. हा खर्च माफ करावा, अशी मागणी करण्यात आल्याने ही रक्कम जलसंपदा विभागास दिली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेने जलसंपदा विभागाने मागितलेला सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आता पुणे महापालिकेकडे या रकमेसाठी तगादा सुरू केला होता. तसेच हा निधी न दिल्यास पाणी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या योजनेसाठी 50 टक्के निधी केंद्रशासन, 20 टक्के निधी राज्यशासन तर 30 टक्के निधी महापालिका देणार आहे.

जे पाणी महापालिकेस दिले जाईल, त्यामुळे सुमारे 10 हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्र कमी होणार आहे. त्याची भरपाई म्हणून प्रति हेक्‍टर 1 लाख 84 हजार रुपयांची मागणी जलसंपदा विभागाने केली होती. मात्र, एवढा खर्च शक्‍य नसल्याने पालिकेने राज्यशासनाने धाव घेतली होती. मात्र, शासनाने त्यास नकार दिला. त्यानंतर पालिकेने पुन्हा शासनास हा खर्च माफ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी हा 162 कोटींचा खर्च देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास समितेने अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेचा खर्च आता 380 कोटींवरून थेट 550 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)