‘भामा आसखेड’ग्रस्तांना 20 वर्षांनी न्याय

शासनाकडून मिळाली बुडीत घराची रक्कम


शिवे, चोरघेवाडी व रौंधळवाडीतील प्रत्येकी पाच शेतकऱ्यांना धनादेश वाटप

पाईट- भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या खास बाब म्हणून बुडीत घरांची रक्कम आज शेतकऱ्यांना वाटप खेड तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे व भामा आसखेड प्रकल्प कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षिणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शिवे, चोरघेवाडी व रौंधळवाडी येथील प्रत्येकी पाच-पाच शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी खेड तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे, सुनील प्रदक्षिणे भामा आसखेड कार्यकारी अभियंता, शिवाजी बार्वे उपकार्यकरी अभियंता, मुसा शेख उपकार्यकरी अभियंता, मच्छिंद्र वाघचौरे सिव्हिल इंजिनिअर, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, पाईटचे तलाठी बी. आर. जाधव, करंजविहिरेचे तलाठी कांचन मगर, सरपंच अरुणा रौंधळ, शामराव रौंधळ, काळू रौंधळ यांसाहित चोरघेवाडी, शिवे, रौधळवाडी येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

शिवे येथील अंतर्गत रस्ते स्मशानभूमी इंधन विहिर – 2.58 कोटी, घरांची एकूण रक्कम 5.29 कोटी यातील 2. 73 कोटी वाटप करण्यात आले असून 2.56 कोटी देण्याची बाकी आहे. रौंधळवाडी व चोरघेवाडी येथे अंतर्गत रस्ते स्मशानभूमी इंधन विहिर – 2.1 कोटी, घरांची एकूण रक्कम 4.06 कोटी रुपये येत्या तीन-चार दिवसांत बॅंक खात्यात जमा करण्यात येतील, असे भामा आसखेड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षिणे यांचनी सांगितले.

भामा आसखेड धरण पूर्ण व्हावे, या स्वच्छ अपेक्षेने ज्या शेतकऱ्यांनी आपली राहती घरे स्वाहा केली. अशा शेतकऱ्यांनी 2002पासून लढा चालू केला होता. त्यातच प्रथमच शासन व प्रशासन यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागणीचा अभ्यास करून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिल्याने शेतकऱ्यांना 20 वर्षांनंतर राहत्या घराचे पैसे मिळाल्याने शिवे, चोरघेवाडी, रौंधळवाडी शेतकऱ्यांनी फटाक्‍यांची आतिषबाजी करीत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण रौधळ यांनी केले तर उपसरपंच किरण चोरघे यांनी आभार मानले.

2009पासून 12 टक्के व्याज देणार
भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी 2002 लढा चालू केला. अखेर 2004ला खास बाब प्रस्ताव मंजूर करण्यात आला. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर 2010 ते 2011ला घरांची मोजणी झाली. त्यामुळे मार्च 2009 साली घरांच्या रकमा ठरविण्यात आल्याने मार्च 2009 पासून मार्च 2017 पर्यंत 12 टक्के व्याजासहित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. गेली कित्येक वर्षे झोपलेल्या शासन व प्रशासनाला अखेर जागे करण्यास यश आल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे

निळवंडे धरण प्रकल्पाचे जवळजवळ पूर्ण पुनर्वसन झाले असून त्याच धर्तीवर भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहे. शेतकऱ्यांनीही थोडं सहकार्य केल्यास घरबांधणी अनुदान, पाणी परवानगी, बुडीत बंधारे, पाण्याचे फेरवाटप इत्यादी प्रश्न सोडवले जातील. तसेच या घरांच्या पैशाबाबत एकमेकांना सहकार्य करा, घरातील वाद घरातच राहुद्या. काम निकृष्ट पद्धतीने होत असेल तर ते थांबवा. तुम्ही आणि मी मिळून सर्व प्रश्न मार्गी लावू.
-सुनील प्रदक्षिणे, कार्यकारी अभियंता भामा आसखेड प्रकल्प


प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे हे यश असून या यशात सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले. अनेक वर्षे जनतेचा लढा सुरू होता. अजूनही बऱ्याच मागण्या बाकी आहेत, त्या पूर्ण होईपर्यंत फेटा बांधणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी शेतकऱ्यांसोबत राहणार असून न्याय मिळेपर्यंत लढणार आहे. बुडीत बंधारे, कर्जत-वांद्रे-भीमाशंकर रस्ता, कुडेश्वर पर्यटन व क वर्ग तीर्थक्षेत्र, स्थानिकांना नोकऱ्या, कौशल्य विकास निवासी कॉलेज अशा योजना पूर्णपणे राबविणार असून या भागाचा विकास म्हणजे आर्थिक परिस्थिती उंचावण्यास पोषक वातावरण निर्माण करणे असं व्हिजन अंमलात आणणार आहोत.
-सुरेश गोरे, आमदार खेड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)