भानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार?

पुणे: दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे माजी प्रमुख भानुप्रताप बर्गे लवकरच शिवबंधन हाती बांधणार असल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. त्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

बर्गे निवृत्त झाल्यावर शहरात त्यांना पुढील कारकिर्दीला शुभेच्छा देणारे फलक लावले होते. त्यावेळीच ते राजकीय पक्षात प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. पुण्यातील गुन्हेगारी जगतावर बर्गे यांचा वचक होता. इसीसमध्ये सहभागी होण्यास जाणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीला ताब्यात घेऊन तिचे मनपरिवर्तन करून पालकांच्या ताब्यात दिल्याने बर्गे चर्चेत आले होते.

चकमकफेम प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातून शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यापाठोपाठ बर्गेही शिवाजीनगरमधून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच माजी पोलिस अधिकाऱ्यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात बर्गे यांना विजयी करण्याचा विडा उचलला असल्याची चर्चा पोलिसांच्या वर्तुळात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×