भानगावप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस

अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्यांची पीडित कुटुंबाची भेट

श्रीगोंदा – तालुक्‍यातील भानगाव येथील आदिवासी महिलेला विवस्र करून मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून शनिवारी (दि.29) राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (विधी) माजी न्यायाधीश सी. एल. थूल व सदस्य सचिव डॉ. संदेश वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. घटना घडल्यानंतर गुन्हा नोंदविण्यास उशीर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस करणार असल्याचे सांगत थुल यांनी त्या कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले.
दरम्यान, तेथील काही लोकांनी थुल यांची भेट घेऊन वास्तव वेगळे आहे, असे सांगितल्यावर जे साक्षीदार आहेत.त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आले. थुल व वाघ यांनी आज सकाळीच घटनास्थळी भेट दिली. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी व इतर अधिकारी उपस्थित होते.
थुल यांनी त्या कुटूंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून नेमके काय झाले. याची विचारणा केली.सगळी घटना ऐकल्यानंतर थुल यांनी त्यांच्या समवेत आलेल्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आलेला एक लाख रुपये मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला दिला. थुल म्हणाले, याप्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. पीडित महिलेवर मोठा अन्याय झाला असतानाही गुन्हा उशिरा दाखल का झाला? समोरच्या लोकांना अगोदर मदत का झाली. या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतर वेळेवर फिर्याद न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस आपण करणार आहोत.
या कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण लगेच देण्याचे आदेश यावेळी थुल यांना मुंडे यांना दिले. दरम्यान, काही अंतरावर थांबलेल्या आदिवासी व इतर समाजातील महिला व पुरुषांनी त्यांची बाजू ऐकून घेण्याची विंनती थुल यांनी मान्य करीत घटना घडली तेथे गेले. त्यावेळी त्या कुटुंबाची आसपास मोठी दहशत असून शेतकऱ्यांना शेती पिकविताही येत नसल्याची व्यथा मांडली. सुरोडी येथील आदिवासी समाजाच्या माजी सरपंच सुमन चव्हाण यांनी त्या घटनेच्या साक्षीदार असून घटना वेगळीच असल्याचे सांगताच थुल यांनी साक्षीदार यांचे जबाब नोंदवून घेण्याचे आदेश केले. जमिनीचे वादाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलतो असेही सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)