भाडे नाकारणाऱ्या ओला, उबर चालकांना 25 हजारांचा दंड होणार

नवी दिल्ली – मोबाईल ऍप द्वारे टॅक्‍सी भाड्याने घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ओला आणि उबर या दोन कंपन्या या साठी सेवा देतात. मात्र, बऱ्याचदा आपण बूक केलेल्या टॅक्‍सीचा ड्रायव्हर अचानक पणे भाडे नकारतो त्यामुळे आपल्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

दिल्लीत असे प्रकार सर्रास घडत असल्यानं नागरिकांना या ओला, उबरचालकांच्या मनमानीचा सामना करावा लागतोय. त्यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी दिल्ली सरकारने एक नवीन धोरण बनवले आहे. जर तुम्ही ओला किंवा उबर टॅक्‍सी बुक केली आणि ऐन वेळी चालकाने घटनास्थळी येण्यास नकार दिला. तर त्याला 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली सरकारने यासाठी नवे धोरण तयार केले असून, लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. या धोरणाच्या मसुद्यात भरमसाठ भाड्यावर नियंत्रण आणि सुरक्षा मानांकन मजबूत करण्याचाही प्रस्ताव आहे. तसेच एखाद्या प्रवाशाने कॅबमध्ये छेडछाड झाल्याचा प्रकाराची तक्रार केल्यास त्या कंपनीला चालकाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवावा लागणार आहे. जर कंपनीने असं केले नाही, तर कंपनीला 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूदही या धोरणात करण्यात आली आहे.

या धोरणाचा मसुदा 2017 मध्ये बांधकाम मंत्री सतेंद्र जैन यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आला आहे. लवकरच हा मसुद्याला दिल्ली मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. दिल्ली वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीत सध्या कॅब सेवा हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन झाले आहे. बरेच ग्राहक ऍपच्या माध्यमातून कॅब बुक करत असतात. त्यासाठीच ही नियमावली बनवण्यात आली आहे. तसेच यासाठी ओला, उबर चालकांना दिल्ली सरकारकडून परवाना घ्यावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)