भाटघर धरणात पाण्याच्या पातळीत वाढ

जोगवडी- भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात 1 जुलै पासून दमदार पावसाने आजपर्यंत विश्रांती न घेता हजेरी लावल्याने 85 टक्के धरण भरले असून, 20.18 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
भोर तालुक्‍यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. 1 जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळाली. यामुळे बळीराजाचा जीव भांड्यात पडला. भात लावणीसाठी योग्य वातावरण आणि पाऊस झाल्याने भात लावणीची कामे आटोपली.
भाटघर धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 23.75 टीएमसी असून, आजपर्यंत 20.18 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणपूर्ण भरल्यानंतर दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग केला जातो. धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी एकूण 81 दरवाजे आहेत, यातील 45 दरवाजे स्वयंचलित आहेत. भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 1443 मिलिलिटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती भाटघर प्रशासनाने दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)