भाजे लेणीत वर्षावास प्रवचन मालिकेचे आज उदघाटन

पिंपरी  – भारतीय बौद्ध महासभा, पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्ह्यात आषाढी पौर्णिमा ते अश्‍विन पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षावास प्रवचन मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचे उद्‌घाटन मावळ तालुक्‍यातील भाजे लेणी येथे शुक्रवारी (दि.27) सकाळी अकरा वाजता होणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी देहूरोड शाखा अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांचे “गुरूपौर्णिमा आणि वर्षावासाचे महत्व’ या विषयावर प्रवचन होईल. या कार्यक्रमाला जिल्हा पर्यटन प्रसार विभागाचे उपाध्यक्ष अरूण सोनवणे, मावळ तालुका अध्यक्ष दलितानंद थोरात, सरचिटणीस दत्ता शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आषाढ पौर्णिमा (27 जुलै) ते अश्‍विन पौर्णिमा (24 ऑक्‍टोबर) या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके व शहर शाखांसह एकूण 21 ठिकाणी ही प्रवचन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, दौंड, बारामती, पुरंदर, वेल्हे, भोर, पश्‍चिम हवेली, पुर्व हवेली शिरूर, इंदापूर या तालुक्‍यांसह देहूरोड, आळंदी, रेंजहिल्स या शाखांच्या बुद्धविहारांमध्ये ही प्रवचन मालिका आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे श्रामणेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक यांची याठिकाणी प्रवचन आयोजित करण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना पावसात भिजल्याने बौद्ध भिक्‍खूंना आरोग्याच्या समस्या भेडसावत. याशिवाय पिकांचे अंकुर पायाखाली येत असल्याने पिकांची हानी होऊ नये, याकरिता पावसाळ्यात बौद्ध लेण्या, बुद्धविहारे अशा एकाच ठिकाणी ध्यानधारणा, प्रवचन व उपासक-उपासिकांना धम्म उपदेश देण्याची प्रथा तथागत गौतम बुद्धांच्या काळापासून सुरू झाली. तेव्हापासून बौद्ध धम्मात ही प्रथा पाळली जात आहे. त्यानुसार या काळात बुद्धविहारांमध्ये बौद्ध भिक्‍खूंचे वास्तव्य असते. तसेच ज्याठिकाणी बौद्ध भिक्‍खूंचे वास्तव्य नसेल, अशाठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी प्रवचन देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)