भाजे गुप्ता विद्यालयात येत्या गुरुवारी माजी विद्यार्थी महामेळावा

कार्ला  – मळवली-भाजे येथील श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात माजी विद्यार्थांचा महामेळावा व तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सरवदे यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव समारंभ व नागरी सत्कार गुरुवारी (दि. 31) सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र केदारी यांनी दिली. माजी विद्यार्थी महामेळावा व गौरव समारंभास अधिकाधिक शिक्षक व आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आहवान माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष मच्छिंद्र केदारी व माजी विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)