भाजप सरकारकडून संविधानाला , लोकशाहीला धोका !

देशातल्या महिला सुरक्षीत नाहीत-फौजीया खान, आ.विद्याताई चव्हाण यांची पत्रकार परिषद
बीड: भाजपसरकारकडून संविधानाला, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सविधान बचावचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दिल्लीत  समाज कंठकांनी संविधान जाळुनही सत्ताधार्‍यांना देशद्रोह वाटला नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. पंतप्रधान मन की, बात करतात जनतेच्या मुख्य प्रश्नावर मात्र बोलत नाहीत.
दररोज महिलांच्या अत्यचारात वाढ होत आहेत. भाजपाच्या 20 आमदारावर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याने सोशल मिडीयात भारतीय बलात्कार पार्टी असे संदेश फिरत आहेत. सरकार मनुवाद अनुइच्छित आहेत, आम्हाला सविधानिक तत्व हवे आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक्रमानिमित्ताने त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सविधान बचाव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी बीडमध्ये हा संविधान बचाव कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आ.विद्याताई चव्हाण, माजी आमदार उषाताई दराडे, जि.प.सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर, केशरबाई गंगाधर घुमरे, चंपावतीताई पानसंबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, राष्ट्रवादीचे युवक नेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, फारुक पटेल, बरखत पठाण, रमेश चव्हाण,उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना फौजीया खान म्हणाल्या की, 9 ऑक्टोंबरला औरंगाबाद येथे सविधान बचाव मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब व इतर नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. या निमित्ताने आम्ही राज्यभर संविधान बचाव मेळाव्याचे कार्यक्रम घेत आहोत. देशात महिला सुरक्षीत नाहीत, ईव्हीएम मशिनमुळे लोकशाही संकटात आली आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात. सरकार प्रसारमाध्यमावर दबाव टाकत आहेत. देशातला भ्रष्टाचार वाढला असुन महिलांवर अत्याचार करणारे सर्वात जास्त भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवला पाहिजे असे सांगत भाजप सरकारवर कडाडून टिका केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)