भाजप-शिवसेना युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच इंधन दरवाढ: राष्ट्रवादी काँग्रेस

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ! उद्धव ठाकरेंनाही पाठवणार कमळाचे फुल

मुंबई: इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना कमळाचे काळे फूल देऊन सरकारचा निषेध केला. भाजप-शिवसेना युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच इंधन दरवाढ झाली असल्याच्या आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीमध्ये ‘विक्रमी’ कामगिरी केली असून पेट्रोलच्या दराने पेट घेतला आहे. पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपयांवर गेले आहे, तर डिझेलचा भडका ७३ रुपये प्रतिलिटरवर पोहचला आहे. मुंबईसारख्या शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांना उच्चांक गाठला असून पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीचा थेट फटका जनतेला बसत आहे” त्यामुळे हे आंदोन करत असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे भाववाढ करून सरकारने मुंबईकरांवर महागाईचा आणखी एक मोठा बोजा टाकला आहे. भाजप- शिवसेना युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच हे झाले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडे कमी झाले होते तेव्हा भाजपने त्याची मोठी जाहिरातबाजी केली होती मात्र आज दरांनी उच्चांक गाठला आहे त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. सरकारमधील लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनाही आम्ही कमळाचे काळे फूल पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1034348107369197568

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)