भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई : भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी भांडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भांडारी गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या शर्यतीत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भांडारी यांचे नाव आघाडीवर होते, मात्र त्यांना डावलून राष्ट्रवादीतून आयात उमेदवार प्रसाद लाड यांना तिकीट देण्यात आले होते. शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही आयात उमेदवार दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून बढती मिळत असल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)