भाजप-कॉंग्रेस दोघेही माझे शत्रू -देवेगौडा

बंगळूरू : काही दिवसांवर कर्नाटक विधानसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे इथल्या राजकारणालादेखील तेवढ्या मोठ्या प्रमाणात रंग चढत आहे. त्यातच आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, कॉंग्रेस आणिभाजप हे दोन्ही माझे शत्रूपक्षच. दोघेही मला नष्ट करण्याची इच्छा बाळगतात.असा गंभीर आरोप माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केले आहे.

काँग्रेसने सिद्धरामय्या यांना माझ्याकडून का हिसकावले गेले? त्यांनी माझ्याकडून एमपी प्रकाशला का पळवले?  काँग्रेसने या लोकांना पळवल्यामुळे माझा मुलगा कुमारस्वामीला भाजपाकडे जावे लागले. त्यामुळे माझी प्रतिमा मलीन झाली, असे  देवेगौडा यांनी म्हटले आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.  तसेच  2019 साली आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगताना एच. डी. देवेगौडा,” मी पुढील वर्षी निवडणूक लढवायचे नसल्याचे ठरवले आहे. काँग्रेस आणि भाजपा नसलेली आघाडी तयार करणे अत्यंत अवघड आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी माझे बोलणे झालेले आहे. मी आता एक ज्येष्ठ म्हणून सल्ला देईन पण कोणतीही सक्रीय भूमिका घेणे मला शक्य नाही. माझी तब्येत चांगली नाही आणि जर पूर्ण न्याय देता येत नसेल तोपर्यंत मला कोणतंही पद नको, असेही देवेगौडा म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)