भाजप कार्यकर्ते देणार सरकारच्या कार्यांची माहिती

  • जनसंपर्क अभियान ः अभियाना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पाठवणार पक्ष कार्यालयाला
  • केंद्र सरकारची चतुर्थ वर्षपूर्ती

पिंपरी – भाजपला केंद्राची सत्ता हाती घेऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षे पूर्तीनिमित्त सध्या पक्षाकडून संपर्क अभियान राबविण्यात येत आहेत. या कालावधीत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामन्यांना देण्यात येत आहे. देशभरात राबविण्यात आलेल्या 15 लाभार्थी योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑडियो कॉन्फरन्स व्दारे संवाद साधणार आहेत, अशी पक्षाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, याकरिता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांचे गट तयार केले जाणार आहेत. हे गट प्रबुध्द व्यक्‍तींशी संपर्क करून केंद्र सरकारच्या 4 वर्षाच्या कार्याची माहिती, विविध प्रकारचे साहित्य नागरिकांना देणार आहेत. विधानसभा स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महापुरूषांचे पुतळे व परिसरात एक दिवसाचे स्वच्छता अभियान व महापुरूष पुजनांचे कार्यक्रम राबिवण्यात येणार आहेत. युवा मोर्चा द्वारा मंडल स्तरावर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील वरिष्ठ नागरिकांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभियाना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पध्द्‌तीने राबवून जाहिर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संपर्क अभियनाचे माध्यमातून शहरामधील नागरिकांना केंद्र सरकारचा 4 वर्षाच्या कालावधीमधील सरकारच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्धार आमदार लक्ष्मण ज़गताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांना दिली आहे.

संपर्क अभियनाचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख म्हणून आमदार लक्ष्मण ज़गताप पाहत आहेत. विशेष संपर्क अभियानाचे संयोजक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा परिषदेचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे असणार आहेत. लाभार्थी संमेलन – गोपाळ माळेकर, पत्रकार परिषद – अमोल थोरात, बुध्दीजीवी संमेलन – सारंग कामतेकर, भारती चव्हाण व बाबू नायर, समरसता संपर्क – संजय मंगोडकर व मनोज तोरडमल, स्वच्छता अभियान – एकनाथ पवार, बाईक रॅली – राजेश पिल्ले व रवि लांडगे, वरिष्ठ नागरीक अभियान – महेश कुलकर्णी, बूथ संपर्क अभियान – अमोल थोरात यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)