भाजपा सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा !- छगन भुजबळ

हिंगोली: राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा आज हिंगोली येथील वसमत येथे दाखल झाली. भाजपा सरकारने पोलिस भरती परीक्षेच्या स्वरुपात बदल केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, असे सांगतानाच हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशांची राज्य सरकारला पर्वाच नसल्याची टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथील सभेत केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की, कर्जमाफी हा महाघोटाळा आहे. मग जर हा महाघोटाळा झाला आहे, तर तो जनतेसमोर मांडण्याऐवजी ते भाजपा सरकारच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, असे आश्वासन देऊन भाजपा सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे, असा आरोप या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. वसमत तालुक्यातल्या शेतकऱ्याने भुजबळ यांना एक निवेदन दिले. मार्च, एप्रिल, मे २०१८ ला केलेल्या तूर विक्रीचे त्याला अजूनही त्याचे पैसे मिळालेले नाहीत आणि पैसे न मिळल्यामुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिवर्तन यात्रा पुढील टप्प्यात पश्चिम महाराष्ट्राकडे कूच करणार आहे. २८ जानेवारी रोजी कागल, मुदाळ, कोल्हापूर शहर व शिरोळ, २९ जानेवारी रोजी कराड, रहिमतपूर व फलटण आणि ३० जानेवारी रोजी पंढरपूर व अकलूज येथे परिवर्तन सभा होणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)