भाजपाच्या आशा पल्लवीत; सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे

मुंबई : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दशेनंतर बळीराजाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रित केलेल्या बैठकीला शिवसेनेचे पालकमंत्री उपस्थित राहिल्याने भारतीय जनता पक्षाच्या आशा उचावल्या आहेत. महायुतीच्या वतीने गुरूवारी सत्तास्थापनेबाबत राज्यपालांना भेटून चंद्रकांत पाटील आणि सुधरि मुनगुंटीवार माहिती देण्यात आली. राज्यातील सरकारला अखेर मुहुर्त मिळाल्याने नागरिकांनी निश्‍वास टाकला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या या भूमिकेवर सायंकाळपर्यंत शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. दरम्यान, अन्य एका महत्वपूर्ण घडामोडीत कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सामनाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून उद्या सत्ता स्थापनेचा दावा करणार असलचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सत्ता ही महायुतीचीच येणार आहे. सत्ता स्थापनेची माहिती देण्यासाठी ते उद्या राज्यपालांनाही भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गुरुवारी सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे आहे.

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित होते.

दरम्यान कॉंग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनानेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची सामना कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपा सेनेचे सरकार स्थापन होणे अवघड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा सेना – राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार येणार असल्याच्या शक्‍यतेला राजकीय वर्तुळात जोर आला. त्यानंतर काही वेळातच ज्येच्ठ नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यात आम्हाला विरोधक म्हणून बसण्याचा जनादेश मिळाला आहे. माहयुतीने सरकार स्थापन करावे. आम्ही सक्षम विरोधकाची भूमिका बजावू, असे त्यांनी नेहमीप्रमाणे विधान केले

शिवसेनेच्या नेत्यांची बैठक उद्या शिवसेना भवानात बोलावण्यात आली असून त्यात भाजपाबरोबर फरफटत जायचे की स्वत:चा कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री बनवायचा याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊयत यांनी सकाळी शरद पावार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार सदएोच्या राजकीय परिस्थितीबद्दल चिंतीत आहेत. पण ते विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत, असे विधान राऊत यांनी केल्याचे एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या वृत्तात म्हटलं आहे. राऊत यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय परिस्थितीबाबत तर्कवितर्ख लढवण्यास सुरवात झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)