भाजपाची ओबीसी समाजाला नवसंजीवनी : विजय चौधरी

कराड : येथील शासकिय विश्रामगृहात आयोजीत आढावा बैठकीत बोलताना विजय चौधरी. व्यासपीठावर विक्रम पावस्कर, अजय भोळे, विकास रासकर व मान्यवर.

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) – ज्या ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचे प्रस्तावाला केंद्रातील मोदी सरकारने मंजूरी दिली आहे. ही ओबीसी समाजाला नवसंजीवनी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.
येथील शासकिय विश्रामगृहात जिल्ह्यातील ओबीसी भाजपा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महामंत्री अजय भोळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर, ओबीसी मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शेजवळ उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडवणीस सरकार गेल्या 4 वर्षांपासून सामान्य जनतेचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या असून त्या जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत. विदर्भ व मराठवाड्यांचा प्रवास संपवून भाजपा ओबीसी मोर्चाच्या संवाद से संपर्क या अभियानाचा दुसरा टप्पा पुणे येथुन सुरू झाला आहे. ओबीसी मोर्चाला बुथ स्तरापर्यंत घेवून जावे लागणार आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक भाजपा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे. येत्या काळात संबंधीत समाजाच्या समस्या व मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी विक्रम पावस्कर, अजय भोळे, विकास रासकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धनगर समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे, अखिल भारतीय ओबीसी संघटना प्रदेश सरचिटणीस सिध्दलिंग स्वामी, माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेजवळ, ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय पवार, नामदेव शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवकांत मुळे, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पवार, नाभिक समाजाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सुरेश पवार यांनी प्रदेश अध्यक्ष चौधरी यांची भेट घेतली व विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. जिल्हा चिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)