भाजपशी युती करून विषाचा घोट घ्यावा लागला – मेहबुबा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये अपरिहार्यतेमुळे भाजपच्या साथीने सरकार चालवावे लागले. त्या पक्षाशी युती करून विषाचा घोट घ्यावा लागला, अशी व्यथा माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी मांडली आहे.

मेहबुबा यांचे वडील दिवंगत मुफ्ती महंमद सैद यांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपी आणि भाजपची युती घडवून आणण्यात योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री झालेल्या मेहबुबा यांनी युती सरकारचे नेतृत्व केले. मात्र, जूनमध्ये भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने ते सरकार कोसळले. त्यानंतर दोन्ही मित्रपक्षांमध्ये कटूता निर्माण झाली. त्याचे प्रतिबिंब मेहबुबा यांच्या भाषणात उमटले. माझे राजकारण वडिलांपासून सुरू झाले. त्यांच्यापर्यंतच माझे राजकारण संपते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सरकार स्थापन करण्याची माझी तयारी नव्हती. मी मुख्यमंत्री बनेल असे मला वाटलेही नव्हते. ते पद स्वीकारण्यासाठी मी तीन महिन्यांचा कालावधी घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वपक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आग्रहामुळे मी नेतृत्व स्वीकारले. भाजपच्या साथीने युती सरकार चालवण्याचा निर्णय मुफ्ती यांनी घेतला. त्यामुळे युती सरकार स्थापन केले नाही तर त्यांच्या निर्णयाचा अनादर केल्यासारखे होईल. तुम्हाला विष प्राशन करावे लागेल आणि डोक्‍यावर विस्तव ठेवावा लागेल असे त्यांनी मला सांगितले, असे मेहबुबा म्हणाल्या.
त्या पीडीपीच्या 19 व्या स्थापनादिनानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होत्या.

सरकार कोसळल्यानंतर पीडीपीमध्ये मेहबुबा यांच्या नेतृत्वाविषयी मोठी नाराजी असल्याचे चित्र समोर आले. अनेक आमदार वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही आल्या. त्यामुळे स्थापना दिनाचे औचित्य साधूून पीडीपीने शक्तिप्रदर्शन केले. मात्र, विधानसभेचे पाच आणि विधाप परिषदेचे दोन असे मिळून सात बंडखोर आमदार या सभेपासून दूर राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)