भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे

संजय राऊत यांचा दावा


भाजपच्या मंत्र्यांनी दावा फेटाळला

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात उसळलेल्या आंदोलनानंतर राज्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आल्यामुळे आता भाजपमध्येच मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले असून तशी चर्चाही सुरु असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या दाव्यामुळे राज्यात आणि विशेष करून भाजपमध्येच खळबळ उडाली आहे. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांचा दावा फेटाळून लावला आहे.

मराठा समाजाचा न्याय्य हक्‍क त्यांना मिळालाच पाहिजे असे सांगून संजय राऊत म्हणाले, राममंदिर असो किंवा मराठा आरक्षण असो… भाजपा विरोधी पक्षात असताना या मुददयावर आंदोलने करत होता. आता सत्तेवर आल्यानंतर ते देणे ही तुमची जबाबदारी आहे. मात्र आता ते देण्यासाठी न्यायालयाच्या सबबी पुढे करायला नको. सरकारने बघ्याची, पळपुटी भूमिका न घेता आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी करतानाच राज्याच्या राजकीय पडद्यावरून सरकार गायबच झाल्याची स्थिती दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शरद पवारांची भूमिका योग्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साप सोडण्याच्या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केलेले मत योग्यच आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानामुळेच मराठा समाज जास्त चिडला आहे, अस्वस्थ झाला असल्याचेही संजय राउत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री बदलाचे काही कारणच नाही. गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री कुणाशीही दुजाभावाने वागलेले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री जास्त प्रयत्नशील आहेत.
चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपमध्ये नाही. इथे सामुहिक निर्णय होतात. पथ का अंतिम लक्ष नही है सिंहासन, पर चढते जाना, सब समाजो को साथ लेकर आगे है बढते जाना… हा आमच्या पक्षाचा विचार आहे.
सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)