भाजपने माणसांमाणसात धर्माच्या नावावर दंगे लावून केले अस्थिरता माजवली – धनंजय मुंडे

हडपसर: भाजपा सरकारने अच्छे दिनच्या गोंडस नावाखाली जनतेची दिशाभूल केली आहे. या सरकारने महागाई वाढवली व सामान्य लोकांचे जीवन अडचणीत आणले आहे. या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात जनता रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

पालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांची शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार समितीच्या वतीने तुपे यांचा विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, जालिंदर कामठे, राजलक्ष्मी भोसले, मंगलदास बांदल, कैलास कोद्रे तसेच या भागातील राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक व पक्षांचे पदाधिकारी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंढे म्हणाले की, सध्या सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्या मनात चीड आहे. हे सरकार शोषण करणारे आहे. या सरकारने माणसांमाणसात धर्माच्या नावावर दंगे लावून अस्थिरता माजवण्याचे काम केले. यावेळी राजलक्ष्मी भोसले, जालिंदर कामठे, सुरेश घुले, राहुल शेवाळे आदींचा सत्कार विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वैराळकर यांनी केले तर, डॉ. अमित तुपे यांनी आभार मानले.

हडपसर ः ग्रामस्थ सत्कार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांचा सत्कार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)