भाजपने देशातील १२५ कोटी जनतेला ठगवले – धनंजय मुंडे

आम्ही साताऱ्याचा विकास केला आणि भाजपाने फक्त घोषणाबाजी 

सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने दिली, त्यातली एकही गोष्ट घडली नाही. त्याबद्दल विचारणा केली तर भाजपाचे लोक म्हणतात की, साठ वर्षांत तुम्ही काय केले? अरे आम्ही १५ वर्षांत कराडला वीज दिली, उपसा सिंचन योजना दिल्या, कॅनॉल दिले. या भागाला कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही, याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या सभेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रहिमतपूरच्या या सभेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील सरकारला चांगलेच धारेवर धरले. कापूस पिकवणारा शेतकरी बोंड अळीमुळे त्रस्त झाला होता, त्यावेळी शेतकरी आम्हाला सांगत होते की, आता कळलं गेली साठ वर्षे आमच्या बापजाद्यांनी भाजपाला का सत्तेवर येऊ दिले नाही. सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही, तेव्हा शेतकरी आमच्याकडे खंत व्यक्त करू लागले आहेत. भाजपच्या जालना येथील अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचीच चर्चा होती. भाजपला झोपेतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच दिसत आहे. मला वाटलं की, मुख्यमंत्री तरी राज्याच्या विकासाबाबत बोलतील. पण तसं झालं नाही भाजपाची मंडळी म्हणते की, महागठबंधन नाही ठगबंधन आहे. अरे तुम्ही देशातील १२५ कोटी जनतेला ठगवले आहे. हे म्हणजे असं झालं की, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)