भाजपच्या सातवांसह चौघांवर गुन्हा

बारामती- शहरातील सातववस्ती मतदान केंद्रवर दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गणेश लहु सातव (वय 34, रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. भाजपाचे प्रशांत (नाना) सातव, अजित सांळुखे, जाधव, नवनाथ भोसले, (तिघांचे पूर्ण नाव माहित नाही, तर चौघे रा. बारामती) यांच्यासह व दोन अज्ञात व्यक्‍तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदानादिवशी मंगळवारी (दि. 23) आरोपींनी सातववस्ती मतदान केंद्र येथे जावून मतदान संपल्यानंतर गणेश सातव यांच्या भवाला शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. यावळी गणेश सातव भांडणे सोडवण्यासाठी गेले असता आरोपी त्यांनी फिर्यादी यास ही शिवीगाळ दमदाटीकरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गणेश हे सुरज सातव यांना घरी सोडण्यासाठी जात असताना फडतरे यांच्या विहीरी जवळ आले असताना वरील आरोपींनी जमाव करून गणेश यांना अटकाव करून मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यात असलेली दोन तोळे सोन्याची चेन बळजबरीने ओढून घेऊन गेल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. दरम्यान, गणेश यांच्यावर सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जबाबीवरून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.