भाजपच्या दोन नगरसेवकांसह शहरातील 56 जण हद्दपार

श्रीगोंदा: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शहरातून 56 जणांना हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांनी दिले. यात भाजपचे सुनील वाळके व नानासाहेब कोथिंबीरे या दोन नगरसेवकांसह शहरातील बहुचर्चित व्यक्तींचा समावेश आहे. श्रीगोंदा पोलिसांनी 142 जणांना शहरातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती, मात्र प्रांताधिकाऱ्यांनी यातील केवळ 56 जणांनाच हद्दपारीचे आदेश काढले.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी 142 जणांना शहरातून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. मात्र प्रांताधिकारी दाणेज यांनी यातील 86 जणांना वगळून त्यांची नावे हद्दपारीतून वगळली. हद्दपार केलेल्यांमध्ये सुनील वाळके व नाना कोथिंबीरे या दोन नगरसेवकांचा समावेश असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातून आजपासून 27 जानेवारीपर्यंत हद्दपार केलेल्या व्यक्ती पुढीलप्रमाणे – सुनील वाळके, हृषिकेश गायकवाड, अविनाश घोडके, अतिक कुरेशी, स्वप्नील खेत्रे, अतुल दुतारे, बंटी उर्फ संतोष कोथिंबीरे, दीपक मखरे, जीवा घोडके, महेश कोथिंबीरे, बत्तीस शेख, नीतीन गायकवाड, युवराज सावंत, इम्रान सय्यद, गुलाब खेंडके, भीमा मखरे, दत्तात्रय खेडकर, गणेश मोटे, गोरख लोखंडे, किरण उर्फ बाळू माने, अजीत माने, सुरेश जाधव, अरविंद माने, अनिल कोथिंबीरे, नाना कोथिंबीरे, बंडू कोथिंबीरे, गणेश कोथिंबीरे, शाम शेंडगे, अनिल शेंडगे, बाळू शेंडगे, राजेंद्र राऊत, वसीम ताडे, बापू दातीर, युसुफ शेख, अमीर शेख, दिलीप लबडे, दत्तु कोथिंबीरे, वैभव काळोखे, आदिशा उर्फ आदिक काळे, भाऊ कोथिंबीरे, विजय साळुंके, दिगंबर साळुंके, सचिन गायकवाड, संतोष मखरे, प्रदीप मोटे, असीफ मालजप्ते, प्रवीण मखरे, अक्षय मखरे, दत्तात्रय वाळके, मंगेश वाळके, सागर मखरे, गणेश चांदगुडे, अक्षय काळे, मंगेश मोटे, गोरख आळेकर, नितीन वाळके. वरील सर्व जणांना शहरातून हद्दपार केल्यानंतर, सुद्धा ते शहरात आढळल्यास अटकेची कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यातील सर्व जण आता श्रीगोंद्याऐवजी शेजारच्या गावातील हद्दीत राहू शकतात. त्यादृष्टीने घोडेगाव, वेळू, चोराचीवाडी, भिंगान, आढळगाव, बेलवंडी कोठार, पारगाव, वडाळी, लिंपणगाव, म्हातारपिंप्री, पेडगाव आदी गावांच्या ठिकाणी वास्तव्य करून पालिका निवडणुकीची सूत्रे सांभाळण्याची अवघड कामगिरी दोन उमेदवार व इतर राजकीय कार्यकर्त्यांना करावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)