भाजपची संस्कृती ज्येष्ठांचा अनादर करणारी – वाघेरे

पिंपरी – केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याविषयी भाजप खासदार पूनम महाजन यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. भाजप आणि आरएसएसची संस्कृती मुळात ज्येष्ठांचा व महिलांचा अनादर करणारी आहे. हेच महाजन यांच्या बोलण्यातून सिध्द झाले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले.

खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ सोमवारी (दि. 4) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सभा घेण्यात आली. यावेळी संजोग वाघेरे बोलत होते. यावेळी पूनम महाजनचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, अशा निषेधाच्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, प्रवक्ते फझल शेख, नगरसेवक नाना काटे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक विनोद नढे, योगेश गवळी, ज्येष्ठ नगरसेविका उषा वाघेरे, संगिता ताम्हाणे, निकिता कदम, उषा काळे, महिला सरचिटणीस कविता खराटे, माजी नगरसेवक संतोष कोकणे, निलेश पांढारकर, कामगार नेते रोझारिवो डिसोजा, विनोद कांबळे, गंगा धेंडे, कुणाल थोपटे, प्रशांत कडलग, दीपक साकोरे, दत्तात्रय जगताप, अमित बच्छाव, महेश माने, बाळासाहेब पिल्लेवार आदी उपस्थित होते.

विशाल वाकडकर म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच देशात प्रथम महिलांना राजकीय व शैक्षणिक आरक्षण देण्यात आले. पूनम महाजन यांच्या जन्मापूर्वी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरगामी धोरणांमुळेच देशाच्या महिला राष्ट्रपती होण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला. ज्येष्ठांचा व महिलांचा सन्मान करणे, हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. खासदार महाजन यांच्या वक्तव्यामुळे देशातील तमाम ज्येष्ठांचा व महिलांचा अपमान झाला आहे. त्यांनी हे वक्तव्य निव्वळ प्रसिद्धीसाठी केले आहे.

यावेळी वैशाली काळभोर, अपर्णा डोके, फझल शेख, संगिता ताम्हाणे यांनी देखील खासदार महाजन यांचा निषेध करणारी भाषणे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)