भाजपचा आज खटावमध्ये शेतकरी मेळावा

ना.चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज राहणार उपस्थित

सातारा,दि.29 प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टीच्यावतीने रविवारी खटावमध्ये महसूल व बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास ना.पाटील यांच्यासह दिग्गज उपस्थित राहणार आहेत. जिहे-कठापूर योजनेला नुकतेच केंद्रिय जलआयोगाने मान्यता दिल्यानंतर महेश शिंदे यांच्या पुढाकाराने खटावमध्ये रविवार दि.30 रोजी गौरीशंकर कॉलेज, खटाव येथे सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांचा स्वप्नपुर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास ना.पाटील यांच्यासह जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रूक्‍मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महेश शिंदे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)