भाजपकडून मुलींच्या कल्याणापेक्षा सरकारी जाहिरातबाजीवर जास्त खर्च ! -राष्ट्रवादी काँग्रेस

अवघ्या १२ रुपयांत बेटीचं शिक्षण?

मुंबई: बेटी धनाची पेटी अशी आपल्याकडे म्हण आहे. महिला-मुलींना सन्मानाचा दर्जाही आपल्या संस्कृतीत आहे. मुलींच्या प्रगतीची काळजी घेणं, त्यांच्या वाढीसाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं, ही सरकारची जबाबदारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र भाजपने मुलींच्या कल्याणापेक्षा सरकारी जाहिरातबाजीवर जास्त खर्च केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीने समोर म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठा गाजा-वाजा करत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ नावानं विशेष योजना जाहीर केली. पण त्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीतून जास्त खर्च मुलींच्या कल्याणापेक्षा सरकारी जाहिरातबाजीवरच झाला, हे वास्तव आहे. त्यामुळे योजनेतून वर्षाकाठी मुलींच्या शिक्षणावर होणारा खर्च अवघा १२ रुपये आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

https://twitter.com/NCPspeaks/status/1088389484524187648

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)