भाजपकडून आपल्याविरोधात सूडाचे राजकारण – रॉबर्ट वड्रा यांचा आरोप

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी आपल्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्त्युत्तर दिले आहे. भाजपकडून आपल्याविरोधात गेल्या चार वर्षांपासून बिनबुडाचे सूडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप वड्रा यांनी केला.

ज्या वेळी सत्तारुढ पक्ष अडचणीत सापडतो, तेंव्हा आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. यावेळी राफेल प्रकरणावरून सरकार अडचणीत सापडले आहे, म्हणूनच आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत, असे वड्रा म्हणाले. आपल्याविरोधातील आरोपांना वड्रा यांनी “होलसेल फार्स’ असे हिणवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारजवळ सर्वच तपास संस्था आहेत. सध्याच्या सरकारला सर्व प्रकरणाची चांगली माहिती आहे. तरीही भाजपकडून बिनबुडाचे सूडाचे राजकारण केले जात आहे. त्याऐवजी 56 इंची छातीच्या माणसाने राफेलबाबतचे सत्य देशाला सांगावे. गेल्या 4 वर्षात त्याच खोट्या गोष्टी सांगितल्यामुळे लोकांनाही कंटाळा आला आहे, असे वड्रा यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. रुपयाची घसरण, इंधन दरवाढ किंवा अलिकडच्या राफेलसारख्या कोणत्याही मुद्दयावरून सरकार अडचणीत्त आले तरी आपले नाव घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

राफेल विमान व्यवहार प्रकरणी गांधी कुटुंबाला खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला होता. वड्रा यांच्याशी संबंधित खासगी कंपनीला ब्रोकर म्हणून निवडण्यात आले नव्हते, म्हणून “युपीए’ सरकारने अब्जावधी डॉलरचा व्यवहार रद्द केला होता, असा आरोप केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी केला होता.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी गेल्या आठवड्यात 58 हजार कोटी रुपयांच्या व्यवहारांबाबत गंभीर आरोप केले होते. भारतीय उत्पादक भागीदारी कंपनीच्या निवडीबाबत फ्रान्सकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता, असे ते म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)