भव्य तिरंगा व अखंड भीमज्योत उभारणार – राजकुमार बडोले

मुंबई: कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी आमदार भाई गिरकर, राज पुरोहित, सामाजिक न्याय व मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याविषयी श्री. बडोले म्हणाले, कुपरेज-ओव्हल मैदानावरील भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारण्याबाबतचा सर्व खर्च सामाजिक न्याय विभाग करेल व राष्ट्रीय तिरंगा ध्वज व भीमज्योतीची देखभाल मुंबई महानगरपालिका करेल. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)