भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग

पिंपरी – तू मला आवडतेस मी तुला मिळवणारच असे म्हणत एकाने तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग केल्याची घटना चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानासमोर घडली. या प्रकरणी शनिवारी (दि. 2) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने फियादी दिली असून मनीष ओमप्रकाश पांडे (वय-24, रा. हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील पाच वर्षांपूर्वी ते एकाच क्‍लासमध्ये शिकत होते. तिथे त्यांची ओळख झाली होती.

यातून मानसिह हा फिर्यादीवर एकतर्फी प्रेम करत होता. 25 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या मोटारीतून मधून जात होती. चिंचवड मधील बर्ड व्हॅली समोर आल्यानंतर आरोपीने त्याची गाडी तरुणीच्या मोटारीला आडवी लावत तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. होळकर तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)