भरतगावजवळ शिवशाहीचा अपघात

अपघातात 18 जखमी; जखमी जिल्हा रूग्णालयात दाखल

नागठाणे (प्रतिनिधी)
पुणे- बंगळूर महामार्गावर भरतगाव (ता. सातारा) येथे ‘शिवशाही’ बसला अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुधवारी सकाळी बस क्रं ( एमएच 09 एम 1939) पुण्याहून चिपळुणला निघाली होती. त्यावेळी भरतगावच्या जवळ बस आली असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे बस दुभाजकावर जाऊन धडकली. त्यानंतर बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघाता बस मधील 18 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात प्रवाशांना दुखापत झाली आहे.

जखमी प्रवाशांना सातारा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल केले आहे. घटनास्थळी सातारचे तहसिलदार निलप्रसाद चव्हाण , हायवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)