भक्‍ती-शक्‍ती चौकात “कॅण्डल मार्च’

पिंपरी – मराठा आरक्षणामध्ये जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी शाम काटगावकर यांना निगडीतील भक्‍ती-शक्‍ती उद्यान येथे भाजप वगळता सर्वपक्षीय तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने रविवारी (दि. 29) श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त कॅण्डल मार्च काढण्यात आला.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, शमीम पठाण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती संघटक वर्षा जगताप तसेच पिंपरी-चिंचवड सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. धनगर, मुस्लिम आदी समाजातील कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी झाले होते. सर्वपक्षीय श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले असताना भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याने राज्य सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, “खोटे गुन्हे मागे घ्या’, “एक मराठा लाख मराठा’, “धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, “मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा आशयाचे फलक हातात घेतलेले सर्वधर्मिय समाजाचे कार्यकर्ते सभेसाठी उपस्थित होते.आंदोलनात मृत्यमुखी पडलेल्यांना 50 लाखाची तत्काळ मदत जाहीर करावी, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलादपूर येथील आंबेनळी घाटात दापोली येथील कृषी विद्यापीठाची बस दरीत पडून झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)