भंडारा-गोंदियात आज 49 ठिकाणी फेरमतदान

मतदानाचा टक्का वाढणार
मुंबई – पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी पोटनिवडणूकीसाठी झालेल्या मतदानादरम्यान दोन्ही मतदारसंघात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. भंडारा-गोंदिया मतदारसंघात 400 हून अधिक व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडण्याचे प्रकार घडल्याने तेथे मतदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा बंद पडलेल्या 49 केंद्रावर बुधवारी फेरमतदान घेण्यात येणार आहे. हे मतदान सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे.

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडण्याच्या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मशीन्स बंद पडल्याने अनेक मतदान केंद्रावर मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले होते. तर काहींनी मतदानावर बहिष्कार टाकत घरी निघून गेले होते. त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत ईव्हीएम मशीन्सबाबत संशय व्यक्त करत दोन्ही मतदारसंघात फेरमतदानाची मागणी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालघरमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बंद पडल्याने काहीवेळ मतदान बंद केले होते. परंतु, तेथे तातडीने मशीन्स नव्याने बसविताच तेथे मतदान सुरळीत सुरु झाले. मात्र, भंडारा-गोंदिया येथे 400 हून अधिक व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडल्या. तेथे नव्या मशीन्स बसविताना निवडणूक आधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. परंतु, या व्हीव्हीपॅटच्या मशीन कमी पडल्याने भंडारा-गोंदियातील 49 मतदान केंद्रावर मतदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता याठिकाणी उद्या, बुधवारी फेरमतदान घेण्यात येणार आहे. भंडारा (14), साकोली (4), अर्जुनी-मोरगाव (2), तिरोरा (8), आणि गोंदिया (21) या विधानसभा मतदारसंघातील हे मतदान केंद्र आहेत.

मशीन्स बंद पडण्याच्या कारणामुळे दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत पालघरमध्ये 62.91 टक्के, तर भंडारा-गोंदियात 72.31 टक्के मतदान झाले होते. मात्र, यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स बंद पडण्याच्या गोंधळाचा फटका मतदानाला बसला. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला. पालघरमध्ये 53.15 टक्के तर भंडारा-गोंदियात 53.22 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मात्र, उद्या भंडारा-गोंदियात 49 ठिकाणी होणाऱ्या फेरमतदानामुळे तेथील मतदानाची टक्केवारी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)