भंडारा-गोंदियातील 35 केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द

भंडारा : पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पडल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. भंडारा आणि गोंदियात तर तब्बल 450 इव्हीएम बंद असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

इव्हीएम बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांना ताटकळत राहावे लागत आहे. सातत्याने येणाऱ्या तक्रारीमुळे, गोंदियातील 35 केंद्रांवरील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अन्य केंद्रांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही आक्षेप घेतला असून, ते पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भंडारा – गोंदिया मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 13.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत. भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)