भंडारा उधळून मराठा आरक्षणाला जेजुरीत पाठिंबा

जेजुरी- मराठा आरक्षण मागणीसाठी आणि समाजबांधवांना पाठिंबा देण्यासाठी जेजुरीकरांनी शुक्रवारी (दि. 27) उत्स्फूर्तपणे बंद पाळला असून, बंद शंभर टक्के यशस्वी झाला. शहरातील सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने मात्र येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुणे-पंढरपूर राज्यमार्गावरील शिवाजी चौकात एकत्र येत सुमारे अर्धा तास रास्ता रोखो करीत आरक्षण मागणीच्या दिरंगाईचा निषेध केला. यावेळी माऊली जाधव, रवी निंबाळकर, संकेत दरेकर, राहुल बयास, सतीश घाडगे, राजेंद्र भोसले, सुरेश उबाळे, वंदना जगताप, मुरलीधर काळाने, विक्रम फाळके, विलास कड, शांताराम कापरे, एन. डी. जगताप, बापूराव भोर, उमेश जगताप, भैया काळे, शिवव्याख्याते निलेश जगताप, नगरसेवक अजिंक्‍य देशमुख, सचिन सोनवणे, मेहबूब पानसरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माणिक झेंडेपाटील, नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांसह जेजुरी पंचक्रोशी कोथळे, रानमळा,मावडी, धालेवाडी, दौडज, क. प. नाझरे, नाझरेसुपे ,भोसलेवाडी आदी गावातील अठरापगड जाती धर्मातील कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)