भंडारदरा साडेनऊ टीएमसी, पावसाची उघडीप

अकोले – अकोले तालुक्‍यात आज दिवसभर धरणांच्या पाणलोटाचा अपवाद वगळता तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली. तर भंडारदरा साडे नऊ टीएमसीच्या आसपास पोहचले.
भंडारदरा धरणात 260 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. धरणात 9 हजार 411 दलघफू इतका साठा झाला आहे. 10 हजार 500-600 दलघफू पाणीसाठा झाल्यावर हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे घोषित केले जाईल.आणि ही घोषणा महिना अखेर होण्याची चिन्हे आहेत. धरणातून 1 हजार 438 क्‍युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. तर त्याखालील निळवंडे धरणात सकाळी 5 हजार 667 दलघफू पाणीसाठा झाला होता. या धरणात 264 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.
तर आढळा धरणात 07 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.धरण साठा 228 दलघफू इतका झाला आहे. तर भोजापूर धरणात नवीन पाण्याची 03 दलघफू आवक होऊन धरण साठा 127 दलघफू इतका झाला. जायकवाडी धरणाचा साठा 49.623 टीएमसी झाला. मुळा धरणात नवीन 390 दलघफू पाण्याची आवक झाली व धरण साठा 15 हजार 055 दलघफू इतका झाला.
गेल्या 24 तासात तालुक्‍यात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : भंडारदरा-47, वाकी-48, पांजरे-45, रतनवाडी-46, घाटघर-71.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)