ब्रेक डाऊन रोखण्याची सक्त ताकीद

पंधरा वर्षांपेक्षा जुन्या बस रस्त्यावर न उतरवण्याच्या सूचना


नयना गुंडे यांच्या समवेत बैठक

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर होत असलेले ब्रेक डाऊन रोखण्याची सक्त ताकीद अध्यक्ष नयना गुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच, पंधरा वर्षांपेक्षा जुन्या बस कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आणू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जानेवारी ते जून 2018 या सहा महिन्यांच्या कालावधीत 29 हजार 847 बस मार्गांवर असताना बंद पडल्याची नोंद पीएमपीएमएल प्रशासनाकडे आहे.

यामध्ये पीएमपीएमएलच्या 14 हजार 68 आणि कंत्राटदारांच्या 15 हजार 779 बसचा समावेश आहे. या आकडेवारीवरून सरासरी 165 बस बंद पडल्या आहेत. तसेच, गेल्या दीड आठवड्यात प्रतिदिन सरासरी पावणेदोनशे बस बंद पडल्या आहेत. त्यामुळे सेवेवर परिणाम झाला होता. काही दिवशी नियोजित फेऱ्यांच्या तुलनेत सुमारे साडेसहा ते सात हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे ब्रेक डाऊनच्या विषयावरून पीएमपीएमएलवर टीका केली जात होती. खुद्द अध्यक्षांनी मेंन्टनेन्स अभावी या बस बंद पडत असल्याचे सांगितले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच, पीएमपीएमएल बसचे ब्रेक डाऊन रोखा, अशी सूचना वाहतूक पोलीस शाखेने पीएमपीएमएल प्रशासनाला केली होती. या पार्श्‍वभूमीवर सर्व डेपो मॅनेजर आणि अभियंत्यांची शुक्रवारी स्वारगेट येथील कार्यालयात बैठक झाली. यात त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. पीएमपीच्या ताफ्यात दोनशे ते अडीचशे बसचे आयुर्मान संपलेल्या असून, त्या ताफ्यातून बाद करण्याची आवश्‍यकता आहे.

मात्र, पुरेसा बस ताफा नसल्याने त्या बस चालवाव्या लागत आहेत. याच बसचे ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण अधिक आहे, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर 15 वर्षांपेक्षा जुन्या बस रस्त्यावर आणू नका, अशा सूचना गुंडे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)