ब्रेकफास्टही करा आरोग्यदायी

अत्यंत व्यस्त वेळापत्रकाला किंवा पॅक केलेल्या अन्नपदार्थांना वैतागला असाल तर आरोग्यदायी ब्रेकफास्टकडेही लक्ष द्या. तीव्र भूक आणि जंक फूड यांचे नाते बरोबरीचे असते. विशेषत: तुम्ही तुमच्या वजनाचे व्यवस्थापन करत असताना आणि आरोग्यकारक जीवनशैलीचा स्वीकार करताना भूकेचे समाधान करणे फार अवघड ठरू शकते.तरीही, जर तुम्ही थोड्या प्रयत्नाने काही सामान्य पथ्यांचे पालन केले, तर तुम्ही जेवणाच्या मधल्या वेळेमधील अल्पोपहार घेणे कमी केल्याशिवाय आरोग्यकारक जीवनशैलीचे व्यवस्थापन करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.

 मुठभर बदाम- भूकेला दूर ठेवा:

मुठभर बदामांमध्ये तृप्त करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे पोट भरले असल्याची अनुभूती मिळते, ज्यामुळे जेवणादरम्यान भूक दूर राहू शकते. वैद्यकीय पोषणाच्या युरोपीय जरनलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार दररोज कोरडे-भाजलेले, हलकेच खारावलेल्या 43 ग्रॅम बदामांचे सेवन केल्यास शरीराचे वजन वाढल्याशिवाय भूक कमी होते आणि आहारात्मक जीवनसत्व ई आणि मोनोसॅचुरेटेड (चांगल्या) मेद ग्रहणामध्ये सुधारणा होते. त्यामुळे, तुमच्या आरोग्याला हानीकारक स्नॅक्‍सच्या चवीच्या जागी आरोग्यकारक बदाम हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आरोग्यकारक फरक जाणवेल.
        फळे:

तुम्ही दररोज सकाळी कार्यालयात किंवा शाळेला निघताना सफरचंद, केळी, पेअर किंवा इतर फळे सोबत ठेवा. दररोज वेगळे फळ निवडल्यास तुम्हाला पुरेशा तंतूंशिवाय पोषकांचे चांगले मिश्रण मिळण्यास मदत होते. तुम्हाला दररोज तोच जुना अल्पोपहार घेऊन कंटाळाही येणार नाही.

चांगली-उकडलेली अंडी:

जर तुम्हाला घाई असेल तर चांगली उकडलेली अंडी हा त्वरित अल्पोपहार आहे. चांगली-उकडलेल्या अंड्यांमध्ये चांगले मेद असते आणि ते तुमच्या हृदयाला निरोगी ठेवते. चांगल्या उकडलेल्या अंड्यांमध्ये तुमच्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि तुमची हाडे मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाची जीवनसत्वे असतात. अंड्याच्या पांढऱ्या भागात रिबोफ्लेविन आणि प्रथिने असतात तर पिवळा भाग हा प्रथिने, जीवनसत्व आणि लोहाने भरलेला असतो. त्यामुळे तुमच्या आरोग्याला हानीकारक अल्पोपहाराच्या जागी चांगली उकडलेली अंडी खा आणि तुमच्या शरीराला आवश्‍यक पोषणाने समृद्ध बनवा.

   अवोकेडोज

अवोकेडोज हे आरोग्यकारक पोषकांनी समृध्द आतात- त्यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी मोनोसॅचुरेटेड मेद, तंतू, जीवनसत्व ई आणि पोटॅशियमचा समावेश होतो. एका संशोधनामध्ये आढळले आहे की, दुपारच्या जेवणासोबत ताज्या अवोकेडोजचा अर्धा भाग ज्या प्रयुक्तांनी खाल्ला त्यांना अधिक समाधान झाल्यासारखे वाटले आणि त्यांना जेवणानंतर काहीतरी खाण्याची इच्छा झाली नाही. त्यामुळे आठवडाभरासाठी तुमच्या फ्रीजमध्ये ताजी अवोकॅडोज भरून ठेवायला विसरू नका!

   ब्लू बेरीज आणि बदामांसह ग्रीक योगर्ट

ग्रीक योगर्ट हे जीवनसत्त्व बी-12, प्रथिने आणि प्रोबायोटीक्‍ससारख्या पोषकांनी युक्त आते. या योगर्ट मधून द्रवरूप व्हे (पाणी) आणि लॅक्‍टोज काढणासाठी ते खूप गाळले जाते, ज्यामुळे मागे आंबट, मलईयुक्त घटक राहतात. हे फार वैविध्यपूर्ण असते आणि ते त्याला चवदार बनवण्यासाठी ते मुठभर बदाम आणि ब्लू बेरीजसोबत खाल्ले जाऊ शकते. हा आरोग्यकारक अल्पोपहाराचा पर्याय बनू शकतो.

ग्रॅनोला बार्स

तुमच्या सामान्य आरोग्याला हानीकारक आणि कॅलरीने भरलेल्या चॉकलेट बार्सच्या ऐवजी कुरकुरीत आणि पोषकांनी युक्त ग्रॅनोला बार्सची निवड करा. ग्रॅनोला हा तंतूं, जीवनसत्त्व आणि आरोग्यकारक मेदांचा चांगला स्त्रोत असतो. साखरेचा घटक नियंत्रणात ठेवण्यासाठी, तुम्ही हे बार्स घरीच तयार करू शकता. तुम्हाला फक्त थोडे ग्रॅनोला, डार्क चॉकलेट, बदाम (अख्खे किंवा तुकडे) आणि टरबूजाच्या बियांची गरज असते. चॉकलेट योग्य तापमानावर गरम करा त्यामध्ये सर्व साहित्य घाला, चौकोनी मोल्डमध्ये ठेवा आणि ते सेट होऊ द्या. चौकोनी काप करा आणि वाढा. हे तुमच्या कार्यालयाच्या ड्रॉवरमध्ये भरून ठेवा आणि निश्‍चिंत राहा!

डॉ. माधुरी रुईया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)