ब्रिलियंट ऍकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

कोळकी – फलटण येथील श्री सद्‌गुरू प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट ऍकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी जि. प.चे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, पंचायत समितीचे सभापती प्रतिभा धुमाऴ, शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिकचे सन्मती देशमाने, फलटणचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, पाटण पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मठपती, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाऴ, प्रा. पी. एन. काळे, श्री सद्‌गुरू शिक्षण संस्थेच्या सचिव ऍड. मधुबाला भोसले, तुषार गांधी, मृणालिनी भोसले, श्री सद्‌गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, संदीप जगताप उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री सद्‌गुरू व महाराजा संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळतो यासाठी अशी वार्षिक संमेलने होणे गरजचे असून पालकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडल्यास त्यांचा भविष्यकाळ निश्‍चित उज्वल राहणार आहे. तसेच ब्रिलियंटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन श्री महामुनी यांनी याप्रसंगी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिलीपसिंह भोसले म्हणाले, सद्‌गुरु व महाराजा उद्योग समुहाच्या माध्यमातून वर्षभर विविध सांस्कृतिक़ शैक्षणिक उपक्रम राबविले जात असतात. सामान्य कुटंबातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे या उद्येशाने ब्रिलियंट ऍकॅडमीची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विधार्थ्यांचा व खेळाडुंचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गणेशवंदना स्कुल चले हम, जाऊ देना व बाहुबली आदी बॉलिवुड़ हॉलीवुड गीतावर नुत्य करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. ब्रिलियंट ऍकॅडमीच्या प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी स्वागत केले. सचिव रणजितसिंह भोसले यांनी प्रास्तविक केले. सारिका लवे यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नाली शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य विश्‍वास केसकऱ, विभाग प्रमुख हेमलता बनकर तसेच शिक्षक़ विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)