ब्राह्मणघर येथे कृषी दिन उत्साहात

भाटघर – माजी मुख्यंत्री वसंतराव नाईक यांच्या 106व्या जयंतीनिमित्त ब्राह्मणघर (ता. भोर) येथे कृषिकन्यांनी कृषी दिन साजरा केला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी समवेत कृषिकन्यांनी वृक्षारोपण केले. तसेच वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व पटवून दिले. लागवडीच्या पद्धती, शेततळे तयार करणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शाळेमध्ये वृक्षसंवर्धन ही काळाची गरज या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिकन्या सोज्वल गुंड पाटील, सोनाली गोसावी, दिपाली घोडके, रचना घार्गे, नूतन गायकवाड, कोमल गायकवाड, अंकिता भोसले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ब्राह्मणघर (ता. भोर) : येथे कृषिकन्यांनी वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.