ब्राझील खाणीतील दुसरे धरणही फुटण्याचा धोका ; मृतांची संख्या झाली 58

रिओ डी जानिरो (ब्राझील): दक्षिण-पूर्व ब्राझीलच्या “व्हेल’ खाणीतील एक धरण शुक्रवारी फुटल्यामुळे मोठा अनर्थ झाला आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या 58 वर गेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार अद्याप 300 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. हे धरण फुटल्याचा धक्का ताजा असतानाच तेथील दुसरे धरणही फुटण्याची शक्‍यता व्यक्त केल्यामुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

फुटलेल्या धरणाचे स्ट्रक्‍चरल सेफ्टी ऑडिट अलीकडेच करण्यात आले होते आणि ते सुरक्षित असल्याचा अहवाल देण्यात आला होता. लवकरच ते बंद करण्यात येणार होते, पण त्यापूर्वीच ही दुर्घटना घडली. आता तेथील दुसरे धरणही फुटण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे. धरण फुटण्याच्या दुर्घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे जामिनास गेराईसचे राज्यपाल रोमेयो जेमा यांनी म्हटले आहे,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)