‘ब्रम्हास्त्र 2’चे शुटिंग सुरू

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्‍शनच्या बॅनरखाली बनलेला आणि रणबीर, आलियाचे लीड रोल असलेला “ब्रम्हास्त्र’ अजून रिलीज देखील झालेला नाही. तोपर्यंत त्याच्या सिक्‍वेलची तयारीही पूर्ण झाली आहे. यामध्येही रणबीर आणि आलिया हे दोघेही असणार आहेत. “ब्रम्हास्त्र 2’मधील काही महत्वाच्या सीनचे शुटिंग या दोघांनी मिळून पूर्ण केले आहे. ज्या सिनेमांचे एकापेक्षा अधिक भाग करायचे असतात, त्यांच्या पहिल्या भागाचे प्रॉडक्‍शन सुरू असेपर्यंत दुसऱ्या भागाचे शुटिंगही सुरू केले जाते. हा हॉलिवूडचा अगदी नेहमीचा ट्रेन्ड आहे. पण बॉलिवूडमध्ये असे फारच क्‍वचित बघायला मिळते. पहिला भाग हिट झाल्यावर मगच पुढच्या भागाच्या तयारीबाबत विचार केला जातो.

“ब्रम्हास्त्र’च्या बाबतीत मात्र अगदी ठरवून पहिल्या भागाचे प्रॉडक्‍शन सुरू असतानाच दुसऱ्या भागाचे शुटिंग केले गेले आहे. “ब्रम्हास्त्र’च्या पहिल्या भागाच्या प्रॉडक्‍शनला झालेला उशीर आणि आलिया-रणबीरच्या तारखांचा मेळ भविष्यात बसणे कठिण असल्याने हा निर्णय घेतला गेला असावा. अलिकडेच कुंभमेळ्यात “ब्रम्हास्त्र’च्या लोगोचे उद्‌घाटन केले गेले होते. तेंव्हापासून “ब्रम्हास्त्र’ रिलीज होण्याचे वेध लागले आहेत. “ब्रम्हास्त्र’मध्ये आलिया आणि रणबीरबरोबर अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत असणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.