बोलाचीच कडी अन्‌ बोलाचाच भात

  • कॉंग्रेसचा आरोप ः भाजपने केला जनतेचा विश्‍वासघात

पिंपरी – केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार म्हणजे बोलाचीच कडी अन्‌ बोलाचाच भात, भाजपने केलाय जनतेचा विश्‍वासघात, अशा शब्दात पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी भाजप सरकारच्या चौथ्या वर्षपुर्तीवर हल्ला केला.

पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजप सरकारने सत्तेत येण्यासाठी जनतेच्या भावनेला हात घालून अशक्‍य असणारी आश्‍वासने दिली होती. मात्र आज सत्तेत येवूनही सरकारने जनतेला दिलेल्या आश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन पाळले नसून तो जनतेचा विश्‍वास घात असल्याने देशभरात कॉंग्रेस 26 मे हा दिवस विश्‍वासघात दिवस म्हणून साजरा करत आहे. भाजप सरकार परराष्ट्र धोरण, अर्थकारण, सामाजिक सलोख, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, शहरावासियांचे प्रश्‍न या सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून भाजपने बेजबाबदारपणे नोटबंदी व जी.एस.टी सारखे निर्णय घेतल्याने सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भाजप पाशवी बळावर लोकशाही पायदळी तुडवत असून त्यांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप साठे यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील प्रश्‍नांविषयी बोलताना ते म्हणाले की, निवडणुकी पूर्वी भाजपने बरीच आश्‍वासने दिली होती. मात्र, महापालिकेत सत्तेत येवून दीड वर्ष झाल्यानंतही दिलेल्या आश्‍वासनांपैकी त्यांनी कोणतेही आश्‍वासन पाळले नाही. भाजप-शिवसेना सत्तेत एकत्र असून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनधिकृत बांधकामे नियमतीकरण, शास्ती कर, प्राधिकरण विलिनीकरण अशी बरीचशी आश्‍वासने दिली होती. मात्र यातील एकही आश्‍वासन त्यांनी पुर्ण केले नाही. महापालिकेच्या स्थापनेपासून भाजपच्या काळात सर्वाधिक भ्रष्ट्राचार झाल्याचा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. गल्ली ते दिल्लीपर्यंत सत्तेत असूनही भाजपचे मंत्री, आमदारांनी एकही काम पिंपरी-चिंचवड शहरासाठी मंजूर करुन आणले नाही. मेट्रो ही कॉंग्रेसची देण असून भाजपने केवळ नारळ फोडून श्रेय घेतले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्य पैसे खाण्याचीच प्रचंड स्पर्धा सुरु आहे. तसेच शहरात भाजपच्या काळातच सर्वाधिक अनधिकृत बांधकामे वाढली असून ती कोणाच्या आशीर्वादाने वाढत आहेत, असा सवाल साठे यांनी केला.

पालक मंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावे
पालक मंत्री गिरीष बापट यांनी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात केलेली आश्‍वासने आठवावीत.त्यात ती किती खरी, किती खोटी आहेत याचे आत्मपरिक्षण करावे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजणाऱ्या पालकमंत्र्यांनी या शहरासाठी किती योजना आणल्या ते सांगावे. तसेच कोणते नवीन उपक्रम शहरासाठी त्यांनी राबवले याबाबत सांगावे, भाजप सरकारने महापालिका निवडणूक कालावधीत दिलेल्या आश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन पाळले नसल्याकडे सचिन साठे यांनी लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)