बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पाचा प्रस्ताव आयुक्‍तांकडून मागे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेत मागे घेतला. त्यामुळे आता हा याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

बोऱ्हाडेवाडीचा गृहप्रकल्पाचा दर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणापेक्षा देखील अधिक आहे. दोन्हीकडील कामाच्या दराची तुलना करून फेरप्रस्ताव दाखल करण्याची उपसूचना स्थायी समितीच्या 18 जुलैला झालेल्या सभेत मंजुरी केली होती. मात्र, सभाशास्त्राच्या नियम 25 नुसार तो विषय दप्तरी दाखल झाल्याने किमान 3 महिने पुन्हा समितीसमोर सादर करता येणार नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आजच्या सभेत सदर विषय आयुक्तांनी मागे घेतला. तशी उपसूचनेत दुरूस्ती करावी, या उपसूचनेला समितीने मान्यता दिली. उपसूचनेतील या तांत्रिक सुधारणेमुळे आता लवकरात लवकर फेरप्रस्ताव सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)