बोऱ्हाडेवाडीतील आरक्षण विकासाला “गती’

  • नगरसेविका सारिका बोऱ्हाडे : भू-संपादन प्रस्तावाला स्थायीची मंजुरी

पिंपरी – मौजे बोऱ्हाडेवाडी येथील मंजूर विकास योजनेतील रस्त्यांचे भू-संपादन आणि आरक्षणे विकास कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिल्याने ती विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, वसंत बोऱ्हाटे यांनी गेले वर्षभर पाठपुरावा केला.

याबाबत नगरसेविका सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या, बोऱ्हाडेवाडीचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने रस्ते आणि आरक्षण विकसित करणे गरजेचे आहे. विशेषत: मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणे विकसित करण्यावर भर दिला. शहर सुधारणा समिती, महासभा व स्थायी समितीने भू-संपादनास येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे या कामास चालना मिळणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी याकामी मार्गदर्शन केले.
रस्ते कामांमुळे बोऱ्हाडेवाडीचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. उद्यान, प्राथमिक शाळा विकसित झाल्याने या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणार आहेत, असेही त्या म्हणाल्या. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांचा कायापालाट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार समाविष्ट गावांत विकास कामे सुरू आहेत. जागा ताब्यात घेण्याची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण व्हावी, याकामी त्यांचे मोठे सहकार्य लाभले, असेही बोऱ्हाडे म्हणाल्या.

…ही आहेत रस्ते, उद्याने, शाळेची आरक्षणे!
बोऱ्हाडेवाडी हद्दीतील गट नंबर 1333 ते 1390 पर्यंत पुणे-नाशिक 60 मी रस्त्यापर्यंतचा मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता, मंजूर विकास योजनेतील गट नंबर 1070, 1022, 1062, 1077, 1076, 1078, 1079, 1080, 1059, 1033, 1035, 1070, 1071, 1072, 1073, 1074, 1075 येथील 7.5 मी. रस्ता व 12 मी. रस्ता, बोऱ्हाडेवाडी येथील संत सावता माळीनगर येथील गट नंबर 1062, 1023, 1026, 1025 मधील 12 मी. रस्ता, गट नंबर 1218 पासून ते 1251 पर्यंत मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता, गट नंबर 1388, 1389, 1375 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/154 प्राथमिक शाळा, गट नंबर 1274, 1273, 1270, 1269, 1268, 1272 मधील विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/155 उद्यान, गट नंबर 775, 774, 773, 776 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/182 प्राथमिक शाळा, गट नंबर 1387 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/167 प्राथमिक शाळेचे भू-संपादन करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)